आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार दोन वर्षांत करणार 72 हजार पदांची भरती, मात्र भरतीप्रक्रियेत नवीन अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारने दोन वर्षात 72 हजार रिक्त पदे भरण्याचा साठी जम्बो भरतीचा निर्णय घेतला आहे याची घोषणो दोन दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणा-या उमेदवारांना सरकारी नोकरीची उमेद निर्माण झाली मात्र या भरती प्रक्रियेत सरकारने नवीन अट घातली आहे. ही पदे भरताना शिक्षण सेवकाच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनावर भरली जातील. त्यानंतर पात्रता आणि कामगिरी बघून ती नियमित केली जातील.

 

फडणवीस सरकार दोन वर्षात तब्बल 72 हजार सरकारी पदे भरणार आहे. त्यापैकी 36 हजार यावर्षी तर 36 हजार पदे पुढील वर्षी भरण्यात येतील. सध्या शिक्षण सेवकांसाठी तीन वर्षे मानधनाची अट आहे, तशाच प्रकारे या पदांसाठी ती आता 5 वर्षे असेल. म्हणजेच नव्याने भरण्यात येणारी यावर्षीची 36 हजार पदे पहिली पाच वर्षे मानधन तत्त्वावर असतील. त्यानंतर ती नियमित केली जातील. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख करण्यात आला आहे. 

 

या निर्णयात, राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणीतील सर्वात खालचे पद तसेच जिल्हास्तरावरील पदे ही शिक्षण सेवक, कृषी सेवक आणि ग्रामसेवकांच्या धर्तीवर प्रथम पाच वर्षांसाठी मानधनावर भरण्यात यावीत आणि त्यानंतर पात्रता व कामगिरी तपासून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.

 

कृषी खात्यातील पदे तातडीने भरणार 
शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी खाते आणि कृषी खात्याशी संबंधित पदे तातडीने आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आत भरण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे .गाव पातळीवर कृषी विषयक कामे होत नसल्याची ओरड गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...