आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Right to Service साठी लोगो व घोषवाक्य सुचवा, सरकारकडून 25 हजार मिळवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील जनतेला पारदर्शक, कालबद्ध आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (RTS) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 या क्रांतिकारी कायद्यामध्ये आजवर 39 विभागांच्या 462 सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. सामान्यांना आपले सरकार संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा केंद्र, सेतू केंद्र आणि आपले सरकार केंद्र याद्वारे या सेवांचा लाभ देण्यात येतो. या कायद्याचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून नागरिकांच्या सहभागातून बोधचिन्ह रेखाटन स्पर्धा घेण्यात येत आहे.

 

बोधचिन्ह आणि घोषवाक्य पाठवण्याची अंतिम मुदत 20 मे 2018 असून विजेत्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. तसेच महाराष्ट्र शासन व राज्य सेवा हक्क आयोगामार्फत पारितोषिक विजेत्या रचनांचा अधिकृत बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणून वापर करण्यात येईल. स्पर्धेच्या अटी, शर्ती आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती  www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...