आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणात राणे- भाजपचा शिवसेनेला 'दे धक्का' तर नाशकात शिवसेनेची भाजपलाच धोबीपछाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र दराडे यांनी प्रतिकूल स्थिती असतानाही विजय खेचून आणला. - Divya Marathi
नरेंद्र दराडे यांनी प्रतिकूल स्थिती असतानाही विजय खेचून आणला.

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेत निवडून जाणा-या पाच जागांचे आज निकाल लागले. यात शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. नाशिक आणि परभणी-हिंगोलीची जागा शिवसेनेने जिंकली तर भाजपने आपल्या पूर्वीच्या अमरावती वर्धाची जागा राखली. कोकणची जागा तटकरेंनी   जागा आपल्याच घरात ठेवण्यात यश मिळाले. 

 

कोकणमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव करून विजयश्री मिळवली आहे. कोकणातून शिवसेनेला अपेक्षा होती मात्र, नारायण राणे आणि भाजपने अनिकेत तटकरेंना मदत करण्याचे धोरण अवलबिल्याने तटकरेंचा विजय सुकर झाला. भाजप व राणेंकडे सुमारे दीडशे- दोनशेच्या घरात मते होती. ती मते एकगठ्ठा तटकरेंना गेल्याने 941 पैकी तब्बल 620 इतकी मते तटकरेंना मिळाली तर राजीव साबळेंना केवळ 306 मते मिळाली. भाजप व राणेंमुळे तटकरेंनी तब्बल 314 मतांनी विजय खेचून आणला.

 

कोकणात भाजपने शिवसेनेला दे धक्का दिला असला तरी शिवसेनेने नाशकात भाजपला धोबीपछाड देत भाजपची मते खेचली आहेत. नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सहाणे यांना मते देण्याऐवजी शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना मते देणे पसंत केल्याचे निकालातील आकडेवारीवरून दिसते. शिवसेनेच्या दराडे यांना 412 मते मिळाली तर शिवाजी सहाणेंना केवळ 219 मते मिळाली त्यामुळे सेनेचे दराडे 193 मतांनी विजयी झाले. नाशिकमध्ये भाजपकडे 167 इतकी निर्णायक मते होती ती मते राष्टवादीला मिळविण्यात अपयश आले असले तरी शिवसेनेने भाजपला दिलेला हा धोबीपछाड मानला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...