सामाजिक न्‍यायमंत्री बडोले / सामाजिक न्‍यायमंत्री बडोले संन्‍यास घेऊन भिक्‍खू बनणार का? थायलंडमध्‍ये श्रामणेर म्‍हणून घेतली दीक्षा

दिव्‍य मराठी वेब टीम

Jul 30,2018 06:58:00 PM IST

मुंबई - राज्‍याचे सामाजिक न्‍याय मंत्री राजकुमार बडोले यांनी बौद्ध श्रामणेर म्‍हणून थायलंडमध्‍ये दीक्षा घेतली आहे. ते शनिवारी थायलंडला रवाना झाले होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.


श्रामणेर म्‍हणजे काय?
बौद्ध धर्मात श्रामणेरला भन्‍ते म्‍हणतात. मात्र ते भदंत किंवा भिक्‍खू नसतात. मात्र काही दिवस ते भिक्‍खू प्रमाणे आयुष्‍य जगतात. यासाठी त्‍यांना भिक्‍खूकडून दीक्षा घ्‍यावी लागते. त्‍यानंतर मुंडन करून तसेच अंगावर काशाय वस्‍त्र धारण करून संघात प्रवेश करावा लागतो. श्रामणेर झालेलया व्‍यक्‍तीला आयुष्‍यभर बौद्ध धर्मातील 10 शीलांचे पालन करण्‍याचे व्रत घ्‍यावे लागते. यानंतर ज्‍या व्‍यक्‍तीला भिक्‍खू बनण्‍याची इच्‍छा असेल त्‍याची संघामार्फत परिक्षा घेतली जाते व संघामार्फत उपसंपदा दिक्षा संस्‍कार झाल्‍यानंतरच त्‍यांना भिक्‍खू म्‍हटले जाते. २० वर्षापेक्षा कमी वयाच्या श्रामणेराची उपसंपदा केली जात नाही.

बडोले संन्‍यास घेऊन भिक्‍खू बनणार का?
यासंदर्भात अधिक जाणून घेण्‍यासाठी आम्‍ही मंत्री बडोले यांना फोन केले. मात्र त्‍यांचा फोन बंद येत होता. त्‍यांच्‍या एका सहका-याकडून आम्‍हाला वरील फोटो मिळाले. मात्र त्‍यांनीही अधिक माहिती देण्‍यास नकार दिला.

पुढील स्‍लाइडवर पाहा, बडोले यांनी दीक्षा घेतल्‍यानंतरचे फोटो...

X
COMMENT