आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी मतदान, उद्धव ठाकरेंनी पत्नी व मुलांसह केले मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षण चार मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान होत आहे. आज सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत हे मतदान होत आहे. मात्र, मुंबईसह कोकण परिसरात सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने मतदानावर त्याचा मोठा परिणाम झाल्याची माहिती येत आहे. शहरी भागात पावसामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे ट्राफिक जाम झाल्याने शिक्षक व पदवीधर मतदार मतदानाला किती बाहेर पडतील याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, दुपारनंतर परिस्थिती निवळली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे व पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह मतदान केले. 

 

मुंबई व कोकण पदवीधर या दोन जागांसाठी तर मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागा अशा एकून चार जागांसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान होत आहे. 

अशा आहेत लढती

 

मुंबई पदवीधर- उमेदवार व पक्ष

 

विलास पोतनीस- शिवसेना


अॅड. अमितकुमार मेहता- भाजप 

 

जालिंदर सरोदे- कपिल पाटील यांचा लोकतांत्रिक जनता दल पक्ष


राजू बंडगर- मनसे स्वाभिमानी पुरस्कृत व मनसेचा पाठिंबा

 
डॉ. दीपक पवार- अपक्ष.

 

मुंबई पदवीधरसाठी 70 हजार मतदार-

 

मुंबई पदवीधरसाठी एकूण 70 हजार मतदार आहेत. त्यात मुंबई उपनगरात 52 हजार मतदार तर
मुंबई शहरात 18 हजार मतदार आहेत. 

 

कोकण पदवीधर उमेदवार व पक्ष-

 

संजय मोरे- शिवसेना 

 

निरंजन डावखरे- भाजप 


नजीब मुल्ला- राष्ट्रवादी काँग्रेस 

 

कोकण पदवीधर 1 लाख चार हजार मतदार-

 

ठाणे : 45 हजार


पालघर : 16 हजार


सिंधुदुर्ग : 5.3 हजार


रत्नागिरी : 16 हजार


रायगड : 19 हजार.

 

..........................................

 

मुंबई शिक्षक मतदारसंघ : पक्ष आणि उमेदवार


शिवाजी शेंडगे- शिवसेना


कपिल पाटील- लोकतांत्रिक जनता दल


अनिल देशमुख- भाजप

 

एकूण मतदार : 10 हजार 169


मुंबई उपनगर : 8273


मुंबई शहर : 1896

 

बातम्या आणखी आहेत...