आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचा 12 वा वर्धापनदिन: माझ्या भाषणादरम्यान लाईट घालविल्यास MSEB अधिका-यांना तुडवा- राज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आज एक तप पूर्ण झाले . त्यामुळे आज मुंबईत कार्यकर्ते व पदाधिका-यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

 

12 वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेची स्थापना केली होती. यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचे 13 आमदार निवडून आणण्याची कमाल केली होती. मात्र, 2014 साली पक्षाची वाताहात झाली होती.

 

लोकसभा व विधानसभा आता पुन्हा 1 वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. मात्र, आज मी काही बोलणार नाही. मला जे काही बोलायचं आहे ते 18 तारखेला शिवतीर्थावरच बोलेन असे राज ठाकरे यांनी सांगितले.

 

वर्धापनदिन मेळाव्यात काय म्हणाले राज ठाकरे...

 

- आज फार काही बोलणार नाही, 18 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर बोलणार
- जे काही बोलायचं ते तेथे मांडणार, गुढीपाडव्याला लाईट घालणा-यांना तुडवा.
- 12 वर्षात अनेक जण आले अनेक जण गेले
- मनसेची आजपासून ऑनलाईन सदस्य नोंदणी,
- राज्यातील जनतेला, तरूणांना 9211787777 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती भरून सदस्य होण्याचे आवाहन
- बोगस आकडेवारी नको, भाजपसारखी सदस्य नोंदणीची मोहिम राबवू नका असे कार्यकर्त्यांना आवाहन

बातम्या आणखी आहेत...