आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झायराशी झालेली छेडछाड लाजिरवाणी- विजया रहाटकर, मुंबई पोलिसांना तातडीने लक्ष घालण्‍याचे निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाने अभिनेत्री झायरा वसिमसोबत झालेल्‍या छेडछाडीची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा विजया रहाटकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने लक्ष घालावे असे निर्देश दिले आहेत. तसेच नागरी विमान वाहतूक प्रवास महासंचालनालयातर्फे याची चौकशी केली जावी म्‍हणून राज्‍य महिला आयोग योग्‍य ती पावले उचलेल, असेही त्‍यांनी सांगितले आहे.


याप्रकरणी बोलताना विजया रहाटकर यांनी घडलेला प्रकार लाजिरवाणा असल्‍याचे म्‍हटले आहे. याबाबत एअरलाईन्‍सने काय कारवाई केली याची चौकशी केली जाईल तसेच फ्लाइट क्रूने झायराला मदत का केली नाही, याचीही चौकशी केली जाईल, असे त्‍यांनी सांगितले. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, झायराशी छेडछाड होत असताना सहप्रवाशांनीही मदत न करणे खेदाचे आहे. महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोग झायरासोबत आहे, अशीही ग्‍वाहीदेखील त्‍यांनी दिली.

 

दुसरीकडे झायराने छेडछाडीचा व्हिडिओ व्‍हायरल केल्‍यानंतर खडबडून जागे झालेले विस्‍तारा एअरलाइन्‍स याप्रकरणी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतल्‍यामुळे आयोगाच्‍या भुमिकेवरही लक्ष लागून आहे. 

बातम्या आणखी आहेत...