आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील 25 जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 27 मे रोजी मतदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 33 जिल्ह्यातील 2 हजार 812 ग्रामंपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांची  घोषण राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकांसाठी 27 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेतमतदान होणार आहे. तसेच मतमोजणी 28 मे रोजी होणार आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. 

 

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल.

 

बातम्या आणखी आहेत...