आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व बहुचर्चित मराठी ‘बिग बाॅस’ या रिअॅलिटी शोचे अँकर महेश मांजरेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लवकरच मांजरेकर यांचा पक्षप्रवेश हाेईल, अशी माहिती आहे.
राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर मराठी कलासृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी या पक्षात प्रवेश केला होता. मात्र कालांतराने एक एक करत ही मंडळी मनसेपासून दुरावत गेली. त्यात आता मांजरेकरांची भर पडणार आहे. २०१४ मध्ये महेश मांजरेकर यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
अशाेक चव्हाणांचे मित्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मांजरेकर हे जवळचे मित्र अाहेत. अंधेरी येथील भवन्स काॅलेजमध्ये ते एकत्र शिकलेले आहेत. त्यांच्या अाग्रहामुळेच मांजरेकर काँग्रेसमध्ये जाऊन राजकारणातील आपली सेकंड इनिंग खेळण्यास तयार झाले असावेत. मांजरेकर यांचा फिल्म इंडस्ट्रीतील मोठा वावर पाहता त्यांचा पक्षप्रवेश काँग्रेसला चांगलाच लाभदायक ठरू शकतो. याबाबत अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागत असेल,’ अशी प्रतिक्रिया दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.