आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जासाठी मल्ल्याने वापरले क्रीडा क्षेत्र; ‘ईडी’चे विशेष न्यायालयात नव्या आरोपपत्रात माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फॉर्म्युला वन शर्यती आणि आयपीएल क्रिकेट लीग यामध्ये उतरवलेल्या आपल्या संघाचा आधार घेऊन मद्यसम्राट विजय मल्ल्या याने भ्रष्टाचाराच्या मार्गांचा अवलंब करून अवैध मार्गाने परकीय चलनाच्या आधाराने पैसा फिरवला. विशेष न्यायालयात सक्तवसुली संचालनालयाने सादर केलेल्या आपल्या दुसऱ्या आरोपपत्रात विजय मल्ल्यावर हे आरोप ठेवले आहेत.  


फॉर्म्युला वन रेसमध्ये मल्ल्याने सहारा फोर्स इंडिया वन टीम उतरवली होती. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या नावाने या मद्यसम्राटाचा संघ उतरला होता. या दोन संघांच्या आधारे ९९९० कोटी कर्ज घेतल्याचा ठपका मल्ल्यावर ठेवण्यात आला.  


‘ईडी’ने गतवर्षीच मल्ल्यावर ८ सहकंपन्यांच्या मार्फत ९०० कोटींचे अवैध हस्तांतरण केल्याचा आरोप ठेवला होता. त्यासाठी बनावट कंपन्या व बनावट संचालकांचाही त्याने वापर केल्याचे आरोप आहेत.  


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून ‘ईडी’ने प्राथमिक आरोपपत्र २०१६ मध्ये दाखल केले होते. भ्रष्ट मार्गाने पैसा वळवण्यासाठी मल्ल्याने विमान, मद्य कंपनीचा वापर केलाच. मात्र, क्रीडा क्षेत्रात प्रवेश करून विविध संघांच्या नावे वापर करण्याची संधीही सोडली नाही. 


फोर्स इंडियात लावला पैसा
एकूण १७ बँकांमार्फत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून ही रक्कम त्यांनी पदरात पाडून घेतल्याचा आरोप आहे. २००८मध्ये त्यांनी २५५ कोटी रुपये इंग्लंडमध्ये वळवले. तीच रक्कम पुन्हा फोर्स इंडिया संघाच्या जाहिराती व पुरस्कर्त्यांसाठीची रक्कम म्हणून भारतात आणली. किंगफिशरच्या खात्यातून सुमारे १५ कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खात्यात वळवले.  

बातम्या आणखी आहेत...