आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण थांबवण्याची धमकी देऊन बापानेच केला मुलींवर बलात्कार, पोलिसांनी केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नराधम बापाने आपल्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा नराधम पेशान फॅशन डिझायनर आहे. दो वर्षांपासून तो 17 आणि 13 वर्षाच्या आपल्या मुलींचे लैंगिक शोषण करत होता. मोठ्या मुलीने बापाचे हे कृत्य असह्य झाल्याने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. वेश्याव्यवसायात ढकलण्याची दिली धमकी....


पीडित 17 वर्षांची मुलगी अकरावीत शिकते. आई, आजी-आजोबा, दोन लहान बहिणी आणि भावासोबत ती राहते. नराधम बापाचे अत्याचार असह्य झाल्यानं तिनं विरोध केला. त्यामुळं त्याने तिला शिक्षणासाठी लागणारे पैसे देण्यास नकार दिला. तसंच घराबाहेर जाऊ नको, असं धमकावलं. अखेर हा सगळा प्रकार तिनं आईला सांगितला. आईनं त्याला जाब विचारला. त्यावर त्यानं या दोघींनाही मारहाण केली. त्यानंतर या दोघांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आई आजारी असल्यानं ती घराच्या खालच्या मजल्यावर राहते. तर वरच्या मजल्यावरील खोलीत मी अभ्यास करत असते. तिथे वडील अत्याचार करायचे. विरोध केला तर मारहाण करायचा आणि लहान भावाला ठार मारण्याची धमकी देत होता, असं पीडितेनं पोलिसांना सांगितलं. 

 

पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लहान बहीण टीव्ही पाहत होती. त्यावेळी त्यानं तिच्यावरही अत्याचार केले. तिनं आरडाओरडा केला. त्यावेळी मी विरोध केला. त्यावर त्यानं माझंही लैंगिक शोषण केलं. इतकंच नाही तर आई आणि मला वेश्याव्यवसाय करण्यासाठी पाठवण्याची धमकीही दिली. पोलिसांनी त्याला सोमवारी सकाळी 6 वाजता अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...