आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धबधब्यावरील स्टंटबाजी बेतली युवकाच्या जीवावर, 150 फूट खोल पाण्यात पडून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव- बेळगावातील गोकक धबधब्यावर स्टंटबाजी करणा-या एका युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित युवक आपल्या भावासमवेत धबधबा पहायला आला होता. मात्र, स्टंटबाजी करण्याच्या नादात तो 150 फूट खोल दरीत पडला. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडियो समोर आला आहे. 

 

काय आहे व्हिडियोत?

 

- व्हिडियोत समोर आले आहे की, हा युवक प्रथम धबधब्यावर जातो. नंतर त्याला स्पर्श करण्यासाठी तेथील दगडाच्या पाय-यावरून खाली उतरताना दिसत आहे. याच दरम्यान त्याचा पाय घसरला व तो खाली दरीत कोसळला.

- या दरम्यान, दुस-या बाजूने हा व्हिडिओ कोणीतरी व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये टिपला.

 

80 किलोमीटर दूर सापडला मृतदेह- 

 

- युवक धबधब्याच्या दरीत पडल्याचे स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. 
- पोलिसांनी सांगितले की, मृत युवकाचे नाव हुसैन आहे. ईदच्या दिवशी दारूच्या नशेत तो आपल्या भावासमवेत धबधबा पहायला आला होता.
- मात्र, त्याच्या स्टंटबाजीमुळे त्याचा जीव गेला. वाहत्या धबधब्यात पडल्यानंतर त्याचा मृतदेह 80 किलोमीटर दूर पाण्यात सापडला.

 

धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी- 

 

- या घटनेत पोलिसांनी गोकक वॉटरफॉलजवळ सिक्यूरिटी टाईट करण्यात आली आहे. तसेच लोकांना धबधब्याजवळ जाण्यास बंदी घातली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...