आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण: अधीक्षकासह सहा महिला पोलिसांवर आरोपनिश्चिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात झालेल्या मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी कारागृह अधीक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह ६ महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या आरोपींवर हत्या, हत्येचा कट रचणे, पुरावे नष्ट करणे, मरेपर्यंत मारहाण असे आरोप आहेत. 


मुंबई सत्र न्यायालयातील न्या. शयना पाटील यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून मंगळवारी या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. भादंविच्या कलम ३०२ अन्वये हत्या करणे, कलम १२० ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम २०१ नुसार पुरावे नष्ट करणे, आणि ५०६न्वये मरेपर्यंत मारहाण करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. मंगळवारच्या कामकाजादरम्यान आरोपींवर ठेवण्यात आलेले आरोप आणि गुन्ह्याचा घटनाक्रम वाचून दाखवण्यात आला. मात्र, आपल्याला सर्व आरोपींंनी हे आरोप फेटाळल्याचे त्यांच्या वकिलांच्या वतीने करण्यात आला. त्यावर 'तुम्हाला जे सांगायचे आहे, ते खटल्याच्या सुनावणीदरम्यान सांगा,' असे निर्देश देत येत्या ३ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. 


आरोपींना कृत्याची जाणीव होती : अहवाल
या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर तत्कालीन कारागृह अधीक्षक मनीष पोखरकरसह महिला कारागृह पोलिस बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा जणींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण करणाऱ्या महिला कारागृह कर्मचाऱ्यांना आपण काय करत आहोत याबाबत पूर्ण कल्पना होती. तसेच आपण जे कृत्य करतोय त्यामुळे एखादी बेकायदेशीर घटना घडू शकते, याची पूर्ण कल्पना आरोपींना होती, असे तपास पथकाच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. 


हत्येचा कट, पुरावे नष्ट केल्याचा ठपका 
प्रकरण नेमके काय? : भायखळा येथील महिला कारागृहात २३ जून २०१७ च्या रात्री मंजुळा शेट्ये या महिला कैद्याला कारागृह कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती. कैद्यांना देण्यात येणाऱ्या जेवणातील अंडी आणि पावाचा हिशोब लागत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरूनही तिला मारहाण करण्यात आली होती. यात मंजुळा शेट्येला गंभीर दुखापत झाली हाेती अाणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा अाराेप पाेलिस कर्मचाऱ्यांवर अाहे. 


९९० पानी आरोपपत्र, १८२ साक्षीदारांचे जबाब 
तत्कालीन कारागृह अधीक्षक मनीष पोखरकरसह महिला कारागृह पोलिस बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे व आरती शिंगणे यांच्याविरोधात ९९० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून १८२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. साक्षीदारांत ९७ कैद्यांचाही समावेश आहे. शिना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणीचा जबाबही घेतला आहे. कारागृहात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...