आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात मान्सून दाखल, 24 तासांत मुंबईत पोहचणार, कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मान्सूनचे आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे. येत्या 24 तासांत मान्सूनचा पाऊस मुंबईत दाखल होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि मुंबईतही पूर्व मान्सूनच्या सरींनी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. आता मान्सूनच्या आगमनाने लोकांना दिलासा मिळाला आहे. 

 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस म्हणजेच 9 आणि 10 जून रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे. 8 ते 12 जून या पाचही दिवशी मच्छीमारांना कोकण आणि गोवा किनारपट्टीवर अरबी समुद्रात मध्य पूर्वेकडे न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. 

 

मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटक, गोव्याहून पुढे सरकत आज मान्सूनने महाराष्ट्राचा दक्षिण भाग व्यापला आहे. येथून पुढे मान्सून तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारपट्टीवरून पुढे सरकत राहील. शुक्रवारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवार, 9 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. 10 व 11 जून रोजी मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. 

बातम्या आणखी आहेत...