आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषादिनी विधिमंडळात मराठी अभिमान गीताचे सामूहिक गायन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मंगळवारी विधान भवनाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताचे सामूहिक गायन करण्यात अाले. प्रसिद्ध गायक कौशल इनामदार आणि त्यांच्यासोबतच्या विद्यार्थ्यांनी हे गायन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, अामदार, पुरस्कारप्राप्त मान्यवर साहित्यिकांची या वेळी उपस्थिती हाेती. तत्पूर्वी विधान भवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...