आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे देशातील पहिली महिला फोटो जर्नालिस्ट, नेहरुंसह अनेकांचे टिपले खास फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहरुजींचा हा फोटो होमीने एका विमानात काढला होता. (इन्सेटमध्ये होमी व्यारावाला...) - Divya Marathi
नेहरुजींचा हा फोटो होमीने एका विमानात काढला होता. (इन्सेटमध्ये होमी व्यारावाला...)

मुंबई- आज देशातील पहिली महिला फोटो जर्नालिस्ट होमाई व्यारावालाचा 104 वा जन्मदिवस आहे. गूगलने सुद्धा त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करताना त्यांचे डूडल बनवले आहे. होमाईबाबत सांगितले जाते की, त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांचे फोटोज काढणे पसंत होते. होमाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचे आणि स्वातंत्र्यानंतरचेही अनेक ऐतिहासिक क्षणांना आपल्या ब्लॅक अॅंड व्हाईट कॅमेर-यात कैद केले आहे. ​पतीच्या मृत्यूनंतर सोडून दिली फोटोग्राफी....

 

-होमाई व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर, 1913 रोजी गुजरातमधील नवसारीतील एका मध्यमवर्गीय पारशी परिवारात झाला होता. त्यांचे पिता पारशी उर्दू थियटरचे प्रसिद्ध अभिनेता होते.  
- सुरूवातीचे शालेय शिक्षण घेतल्यानंतर होमाई यांनी बॉम्बे यूनिवर्सिटी आणि सर जे जे स्कूल ऑफ ऑर्टमधून शिक्षण घेतले. शिक्षण संपताच त्यांनी मुंबईतील एका वृत्तपत्रासाठी फोटोग्राफर म्हणून काम सुरू केले. नंतर येथेच करिअर करण्याचे ठरवले. 
- वर्ष 1942 (दुस-या महायुद्धादरम्यान) मध्ये व्यारावाला यांना ब्रिटिश इन्फॉर्मेशन सर्विसने नवी दिल्लीत नोकरी दिली. सोबतच त्यांनी बॉम्बेच्या 'The Illustrated Weekly of India’ मॅगझीनमध्ये काम केले. 
- वर्ष 1970 मध्ये होमाई यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर फोटोग्राफी सोडून दिली. त्यांना फोटोग्राफी करण्यावरून जी बंधने घातली गेली होती ती पसंत नव्हती.

 

गूगलने वाहिली श्रध्दांजली-

 

- जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलने भारतातील पहिली महिला फोटो जर्नालिस्ट होमाई व्यारावाला यांचे डूडल काढत त्यांची आठवण काढली. व्यारावाला यांचा आज 104 वा जन्मदिवस आहे.  
- यावर गूगलने त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक जुनी छायाचित्रे काढून त्याला एक कोलाजचे स्वरूप दिले. यात देशातील पहिली फोटो पत्रकार होमाई दिसत आहेत. त्यांना आपल्या कॅमे-याने छायाचित्र काढताना दाखवले आहे.

 

ऐतिहासिक क्षण कैद केले कॅमे-यात-

 

- होमाई व्यारावालाने ऑगस्ट 1947 मध्ये लाल किल्ल्यावर पहिल्यांदा फडकलेल्या भारताच्या तिरंगा झेंड्याचे, भारतातून लॉर्ड माउंटबेटनची परत जाणे, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि लालबहादुर शास्त्री यांची अंतिम यात्रेचे फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले होते. 
- याशिवाय महात्मा गांधी, जवाहरलाल नहरू, मोहम्मद अली जिना, इंदिरा गांधी आणि नेहरू-गांधी फॅमिलीचे खूप फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले होते.

 

सरकारने दिला पद्मविभूषण-

 

- होमाई सुमारे 40 वर्षे फोटोग्राफीशी जोडल्या होत्या. 2010 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले. 15 जानेवारी, 2012 रोजी त्यांचे निधन झाले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, देशातील पहिल्या महिला फोटो जर्नालिस्टने टिपलेले काही खास फोटोज...

बातम्या आणखी आहेत...