आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- ‘पा’ या चित्रपटात अभिषेक बच्चनने एका राजकीय व्यक्तीचा रोल केला आहे. त्यासाठी अभिषेकने माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याकडून टिप्स घेतल्या. अभिषेक त्यांचे जुने मित्र आहेत. ते दोघेही अमेरिकेतील एका विद्यापीठात शिकले आहेत. मिलिंदने चित्रपट निर्माते मनमोहन शेट्टी यांच्या मुलीसोबत काही वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केले होते. सरोगेट मुलीचे वडील झाल्यानंतर हे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
2004 मध्ये फोटोशूट दरम्यान झाली भेट
- 4 डिसेंबर 1976 मध्ये जन्म घेतलेल्या मिलिंद देवरा यांनी मुंबईच्या कॅथेड्रल अॅन्ड जॉन कोनन शाळेतून शिक्षण घेतले. सिडेनहम कॉलेजमधून त्यांनी बीए केले. त्यानंतर बोस्टन विद्यापीठातुन त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली.
- 2009 मध्ये मिलिंद देवरा यांनी चित्रपट निर्माते मनमोहन शेट्टी यांची मुलगी पूजा सोबत लग्न केले. त्यांची पहिली भेट 2004 मध्ये एका फोटोशूट दरम्यान झाली. दोघांनी काही वर्षे डेटिंग केली.
- मिलिंद यांचे मोठे भाऊ मुकूल यांची पत्नी निताशा सॉफ्ट बॅंकेचे माजी अध्यक्ष असणाऱ्या निकेश अरोरा यांची पत्नी आयशाची बहिण आहे. माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा त्यांचे वडील आहेत तर आई हेमा देवरा या गृहिणी आहेत.
वैयक्तिक जीवन अतिशय वेगळे
- मिलिंद यांनी सांगितले की, 2004 मध्ये संसदेत अतिशय कमी वयाच्या खासदारांमध्ये त्यांचा समावेश होता. त्या काळात मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळित झाले होते. त्यांनी पाण्याचा लवकर निचरा व्हावा यासाठी 1200 कोटीचे काम केले. माहितीच्या अधिकारासाठी त्यांनी चर्चा घडवून आणली. वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई मेट्रोचा प्रकल्प मार्गी लावला. माझे वैयक्तिक जीवन राजकीय जीवनापेक्षा मात्र खूपच वेगळे आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.