आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन आगामी मुख्‍यमंत्री ठरवावा; काँग्रेसला फायदा होता कामा नये- चंद्रकांत पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. 19) राज्‍याचा पुढील मुख्‍यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशी गर्जना केल्‍यानंतर भाजपने यावर सावध भुमिका घेतलेली दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्‍या घोषणेवर प्रतिक्रिया देताना राज्‍याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, 'दोघांच्‍या दुहीचा फायदा काँग्रेसला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे', असे मत पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केले. तसेच आगामी मुख्‍यमंत्री दोन्‍ही पक्षांनी एकत्रित येऊन ठरवावा, असेही ते म्‍हणाले.


शिवसेनेच्‍या 52व्‍या वर्धापनदिनी 'महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल. दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तसेच राज्‍यात शिवसेनेचाच मुख्‍यमंत्री होईल', असा विश्‍वास व्‍यक्‍त केला होता. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्‍हणाले की, 'दोघांच्‍या दुहीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होऊ नये ही आमची इच्छा आहे. आपला मुख्‍यमंत्री व्‍हावा असे प्रत्‍येकाला वाटते. आम्‍हालाही 2019मध्‍ये भाजपचा मुख्‍यमंत्री होईल, असे वाटते. मात्र दोन्‍ही पक्षांनी एकत्रित येऊन याचा निर्णय घ्‍यावा.'

 

बातम्या आणखी आहेत...