आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध भेसळखोरांना जन्मठेपेची शिक्षा देण्याबाबत चाचपणी करू : बापट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दूध भेसळखोरांवर कठोर कारवाईबाबत तरतूद करण्याची सूचना केंद्र सरकारकडून प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद असलेला प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिली. तसेच इतर काही राज्यांच्या धर्तीवर दूध भेसळखोरांना जन्मठेपेची शिक्षा करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्याच्या सूचनाही देण्यात येतील, असेही बापट म्हणाले. राज्यात होत असलेल्या दूध भेसळीबाबतची लक्षवेधी सूचना चर्चेला आली होती.
बातम्या आणखी आहेत...