आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PALGHAR BYPOLL : भाजपने पालघरमधील EVM मशीनमध्ये रात्रभर सेटिंग केली- हितेंद्र ठाकूर यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान होत आहे. मशिन बंद पडण्याच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडत आहे. सकाळी दहा पर्यंत पालघरमध्ये 10 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर गंभीर     आरोप केले आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी आज सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजपवर हल्लाबोल केला. 


काय म्हणाले हितेंद्र ठाकूर-

 

- बहुजन विकास आघाडीचा उमेदवार पराभूत व्हावा यासाठी भाजपच्या दबावामुळे प्रशासनाने अनेक ठिकाणी मतदानच सुरु केलेले नाही. 

 

- काही ठिकाणी तहसीलदार आणि यंत्रणेला हाताशी धरुन भाजपने मतदान यंत्रे मॅनेज केल्याचा संशय आहे. कारण अनेक ठिकाणी निवडणूकीशी संबंधित अधिकारी रात्री दोन-तीन पर्यंत EVM मशिन्स दुरूस्त करत होते. 

 

- पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष शहरी भागातील लोकांना प्रलोभने दाखवत आहेत. रहिवासी सोसायटीत फोन करून लोकांना जेवण, नाश्ता यासह विविध प्रलोभने दाखविली जात असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. याचा पुरावा म्हणून त्यांनी मिडियाकडे फोन रिकॉर्डिंग सादर केले.

 

- भाजपशी संबंधित लोकांनी आपल्या पेट्रोलवर पंपावर 1 रूपयाने स्वस्त पेट्रोल विकण्यास सुरूवात केली आहे. मागील 13 दिवस सलग पेट्रोल दर वाढवत असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप गैरमार्गाचा वापर करत आहे. पेट्रोल स्वस्त केल्याबाबत होर्डिंग लावली गेली आहेत.

 

- भाजपने या निवडणुकीसाठी करोडो रूपये वाटले आहे. साम- दाम- दंड- भेद याचा वापर तर भाजपने केलाच आहे पण बहुजन आघाडीचे वर्चस्व असलेल्या भागात EVM मशिन्स बंद पाडत भाजपने आता रडीचा डावही खेळला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...