आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार लाड यांची कंपनी मानवी तस्करीत गुंतलेली, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे विधान परिषदेतील आमदार आणि मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रसाद लाड (मुंबई) प्रवर्तक असलेली 'क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस' ही कंपनी मानवी तस्करीत गुंतली आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

 

सुप्रिया सुळे यांनी शनिवारी त्यासंदर्भात ट्विट करत "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्या राज्यात काय चाललंय, हे सगळं तुमच्या देखत होतंय, हाच का तुमचा पारदर्शक कारभार?' असा सवाल केला. मानवी तस्करीत गुंतलेले लाड भाजपमध्ये आले की कसे पावन झाले, अशी विचारणाही सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 


लाड यांची हवाई क्षेत्रात क्रिस्टल एव्हिएशन नावाची कंपनी कार्यरत आहे. त्या कंपनीवर सुळे यांनी मानवी तस्करीचा म्हणजेच देहव्यापारात गुंतली असल्याचा आरोप केला आहे. आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ सुळे यांनी नागरी हवाई सुरक्षा विभागाने (बीसीएएस) तसा अहवाल दिला असल्याचे म्हटलेले आहे. 

 

विशेष म्हणजे लाड पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. लाड यांचा राजकीय क्षेत्रातला उदय राष्ट्रवादीच्या साथीने झाला. आघाडी सरकारच्या काळात लाड यांच्याकडे इमारत बांधकाम मंडळाचे अध्यक्षपद होते. काही महिन्यांपूर्वी लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नारायण राणे यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला, त्या जागेवर सोलापूरचे काँग्रेस नेते दिलीप माने यांचा पराभव करत लाड परिषदेवर आले. लाड यांचे भाजपमध्ये मोठे प्रस्थ आहे. 

 

पूर्वीपासून व्यवसायात कार्यरत : प्रसाद लाड 
मी राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हापासून याच व्यवसायात आहे. त्यामुळे सुप्रियाताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी शहानिशा करायला हवी होती. आरोप झाले की तो माणूस मोठा होतो, हे मी मोठ्या पवार साहेबांकडून शिकलो आहे. त्यामुळे ताईंचे ट्विट माझा राजकीय भाव वाढला असल्याचे द्योतक असून राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...