आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'नटसम्राट आले, बडबडले अन् निघुन गेले! कोकणी जनतेला काय मिळालं- बाबाजी का टुल्लू!!\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नितेश राणे यांनी हे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. - Divya Marathi
नितेश राणे यांनी हे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे.

मुंबई- नटसम्राट आले, बडबडले अन् निघुन गेले! कोकणी जनतेला काय मिळालं बाबाजी का टुल्लू!! अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरीतील नाणार येथे जाऊन नाणार प्रकल्प होणार नाही. नाणार प्रकल्प घालवला आहे. माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची राख केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या कोकणाला, इथल्या कोकणी माणसाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला उद्ध्वस्त करू, अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रिफायनरीची आधिसूचना रद्द केली आहे. आता रिफायनरी होणार नाही नाणार वासियांनी आता आनंदोत्सव साजरा करा. नाणार राहणार प्रकल्प गेला, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द करत असल्याचे जाहीर केले. 

 

मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सुभाष देसाईंनी अधिसूचना रद्द करण्याबाबतचे मत व्यक्त केले. पण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. सरकारचे मत नाही. अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. तो अधिकार मंत्र्यांना नाही. अधिसूचना रद्द करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव समितीसमोर अद्याप आलेला नाही. त्यामुळे राज्याच्या आणि कोकणाच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. सरकारने अद्याप अधिसूचना रद्द केलेली नाही, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व सुभाष देसाई यांना तोंडावर पाडले. यानंतर नितेश राणेंनी शिवसेनेला चिमटा काढत नटसम्राट आले, बडबडले अन् निघुन गेले! कोकणी जनतेला काय मिळालं- बाबाजी का टुल्लू!! अशा शब्दांत खिल्ली उडविली.

 

नितेश राणे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, नाणार प्रकल्प भूसंपादन अधिसूचना रद्द करायची असेल तर तहसीलदार कडून जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी कडून सचिवांना प्रस्ताव जावा लागतो. मग ती फाईल मंत्र्यांकडे येते. अजून तशा प्रकारची फाईल ठेवण्यात आलेली नाही. नाणार रिफायनरी प्रकल्प अधिसूचना रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळात मांडावा लागतो. मंत्रिमंडळात मांडल्यावर त्यानंतरच त्याबाबत निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे जाहीर सभेत तो रद्द करता येत नाही हे आधी सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे यांनी समजून घ्यावे, या शब्दात टीका केली आहे. 

 

भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई जनतेची दिशाभूल करताहेत. फक्त जाहीर सभेत फसवी घोषणा प्रत्यक्षात कागदावर काहीच नाही, असेही नितेश यांनी म्हटले आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...