आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरंजन डावखरेंचा NCP च्या सर्व पदाचा राजीनामा, पित्याच्या माघारी शरद पवारांना \'दे धक्का\'!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार निरंजन डावखरे यांनी फेसबुकवर राजीनाम्याबाबत केलेली पोस्ट... - Divya Marathi
आमदार निरंजन डावखरे यांनी फेसबुकवर राजीनाम्याबाबत केलेली पोस्ट...

मुंबई- कोकण पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी दुपारी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला. डावखरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरूवारी (24 मे ) पालघरमधील जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष सोडू नये म्हणून मोठा दबाव आणला जात असल्याचा आरोपही डावखरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी केला आहे. 

 

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे पक्षातंर्गत कोंडीला वैतागून भाजपात जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठाण्यातील स्थानिक नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्याकडून कोंडी केली जात असल्याने निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डावखरे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायघड्या घातल्या असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपवासी होणार आहेत.

 

निरंजन डावखरे हे वसंत डावखुरे यांचे राजकीय वारसदार आहेत. वसंत डावखरे हे शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जायचे. सोबतच डावखरे यांचे सर्वपक्षीयांसोबतच शिवसेनेशी उत्तम संबंध होते. जानेवारी 2018 मध्ये वसंत डावखरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे निरंजन डावखरे राजकारणात सध्या एकाकी पडले आहेत. जुलै 2012 मध्ये ते कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, आता राष्ट्रवादीकडून त्यांना संधी दिली जाईल का याबाबत साशंकता होती. ठाणे राष्ट्रवादीत सध्या जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांचाच शब्द चालतो.

 

कोकण पदवीधर मतदारसंघातून या दुकलीने डावखरेंऐवजी नवा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे डावखरे यांनी आपले राजकीय अस्तित्त्व टिकविण्यासाठी भाजपशी जवळिक साधण्याचा प्रयत्न केला. यातूनच ते भाजपच्या गळाला लागले आहेत. भाजप त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून संधी देऊ शकते. 2012 साली भाजपकडून पदवीधर संघातून लढलेले संजय केळकर 2014 साली विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे भाजपने डावखरेंना तेथे संधी देण्याचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. सोबतच ठाणे पटट्यात शिवसेना व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपला डावखरेंसारखा तरूण नेत्यांची गरज आहेच. त्यामुळे डावखरेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पक्का केल्याचे कळते.

 

2012 साली कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून 5604 मतांनी विजय मिळवला होता. त्याआधी कोकण पदवीधर मतदारसंघ सुमारे 20 वर्षापासून भाजपच्या ताब्यात होता. डावखरे यांची एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची तेवढी क्षमता नाही. त्यामुळे जुलै 2018 मध्ये होणा-या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाऊन पुन्हा आमदार होण्याचा डावखरेंचा प्रयत्न आहे. 

 

हे ही वाचा...


राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपच्या गळाला? पुन्हा आमदार होण्यासाठी पाऊल

बातम्या आणखी आहेत...