आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलापूरच्या इंग्रजी शाळेत MNS कार्यकर्त्यांचा राडा, मुलीची छेड काढणाऱ्याला चोपले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बदलापूर परिसरात एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार राडा केला. जवळपास डझनभर मनसे कार्यकर्त्यांनी प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच कार्यालयाची तोडफोड सुद्धा केली. त्या शाळेतील कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड काढली असा आरोप आहे. विशेष म्हणजे, मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण होत असताना त्या ठिकाणी पोलिस देखील उपस्थित होते. 


विद्यार्थिनीला एकट्यात पकडून केली छेडछाड
मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे, की शाळेत मंगळवारी एका विद्यार्थिनीला एकट्यात पकडून तिचा विनयभंग केला. त्या मुलीने यासंदर्भातील तक्रार आपल्या कुटुंबियांकडे केली. त्यानंतर बुधवारी तिचे कुटुंबीय आणि मनसेचे कार्यकर्ते शाळेत धडकले. त्यांनी त्या आरोपी पकडून बेदम मारहाण केली. मारहाण करतानाच त्याला प्रिन्सिपलच्या कॅबिन पर्यंत फरपटत नेले. त्या ठिकाणी सुद्धा त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई केली नाही.

बातम्या आणखी आहेत...