आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपेल; खोटे बोलून जनतेला फसवले, राज ठाकरेंची नरेंद्र मोदींवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- एक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यात संपेल, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. चिपळून येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


गुडीपाडवा मेळाव्यापासून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र   मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी चिपळून येथे बोलताना देखील त्यांनी मोदी सरकारला हुकूमशाही असे संबोधले. मोदींविषयी विचारणा केली तेव्हा त्यानी पंतप्रधान मोदींना हुकूमशहा ठरवले. तसेच देशातील हुकूमशाही येत्या सात-आठ महिन्यांत संपेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला.

 

नुकत्याच कर्नाटकात झालेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात भाजप विरोधात देशातील सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. याचा दाखला देत, भाजपाविरोधी एकीचा पहिला गिअर आपणच गुढीपाडव्याच्या सभेत टाकला होता, आसा दावा राज ठाकरे यांनी काल केला होता. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.


केंद्रातील मोदी सरकारला शनिवारी चार वर्ष पूर्ण झाली. साफ नीयत-सही विकास हा नवा नारा मोदी सरकारने दिला आहे. या निमित्ताने एकीकडे भाजप आज चौथा वर्षपूर्ती सोहळा साजरा करत आहे तर, दुसरीकडे विरोधक हा दिवस 'विश्वासघात दिन' पाळणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...