आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा 13 जानेवारीस रत्नागिरी दौरा; नाणार प्रकल्पाबाबत भूमिका जाहीर करण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे 13 तारखेला रत्नागिरीतील नाणारला भेट देणार आहेत. नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत. गेल्या 20 दिवसात बरेच काही घडले आहे. माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) वाढला आहे. पण मी अनुशेष ठेवणाऱ्यातला मी नाही. लवकरच तो बॅकलॉग भरून काढणार आहे. माझ्या तडाख्यातून सुटलो असे कोणाला वाटत असेल तर चूक, व्यंगचित्रातून तडाखे बसणारच अशा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच दिला होता.

 

 

राज ठाकरे स्थानिक ग्रामस्थाशी संवाद साधणार आहेत. नाणार ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असून त्यांची मते राज ठाकरे जाणून घेणार आहेत. त्यानंतर प्रकल्पाबाबत ठाकरे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

 

 

गुजरातचा लँड माफिया राज्यात सक्रीय

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. त्यातच या प्रकल्पासंदर्भात विनायक राऊत यांनी एक धक्कादायक आरोप सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात गुजरातच्या लँड माफियांचा सुळसुळाट झाला असून, जवळपास दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँड माफियांनी विकत घेतली आहे असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...