आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या हाताला बाळासाहेबांचा स्पर्श- शिवसेनेत प्रवेशावेळी शिशिर शिंदे भावूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकल्याशिवाय शिशिर शिंदे शांत बसणार नाही असे भावूक उद्गारही त्यांनी काढले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिशिर शिंदे यांना शिवबंधन बांधले.

 

शिशिर शिंदे म्हणाले, मी एकदा सहज उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो. नंतर चर्चा झाल्यानंतर बाहेर जाताना उद्धव यांनी त्यांचा हात माझ्या हातात दिला. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंच्या हाताला बाळासाहेबांचा स्पर्श असल्याचे जाणवले. त्यानंतर मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिशिर शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांची माफी मागून मला आपल्या घरात मोठ्या मनाने घरात घ्या, अशी विनंती केली. यावर सर्वत्र टाळ्याचा कडकडाट झाला.

 

बातम्या आणखी आहेत...