आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पदवीधर मतदारसंघात मनसेचा नारायण राणेंच्या पक्षाचे राजू बंडगर यांना पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजू बंडगर यांनी मंगळवारी सायंकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकूंज या घरी जाऊन भेट घेतली. - Divya Marathi
राजू बंडगर यांनी मंगळवारी सायंकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकूंज या घरी जाऊन भेट घेतली.

मुंबई- मुंबई पदवीधर मतदारसंघातील मुंबई ग्रॅज्युएट महासंघ आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुरस्कृत उमेदवार राजू बंडगर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राजू बंडगर यांनी मंगळवारी सायंकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकूंज या घरी जाऊन भेट घेतली. यानंतर मनसेने पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसिद्ध केले आहे. 

 

मुंबई पदवीधर मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होत आहे. येत्या 25 जून रोजी मतदान होणार आहे तर 28 जून रोजी निकाल हाती येतील.

 

असे आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार-

 

विलास पोतनीस- शिवसेना
अमित महेता - भाजप
राजेंद्र कोरडे – शेकाप (काँग्रेस- राष्ट्रवादीचा पाठिंबा)
राजू बंडगर - नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष पुरस्कृत
जालिंदर सरोदे – शिक्षक भारती
दीपक पवार - अपक्ष

बातम्या आणखी आहेत...