आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचं सर्जिकल स्ट्राईक; खड्डेयुक्त रस्त्यांचा निषेध म्हणून मंत्रालयासमोरचा रस्ता फोडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- निष्क्रिय युती सरकार मधील मंत्र्यांनीही महाराष्ट्रातील जनतेप्रमाणे खड्ड्यांचा त्रास सोसावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील रस्ता फोडला. महाराष्ट्रातील खड्डेयुक्त रस्त्यांचा निषेध नोंदवत मनसैनिकांनी हातात कुधळ-फावडे घेऊन मंत्रालयाच्या मुख्य गेटवरून येणाऱ्या जाणारा रस्ता खोदला. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या 4 कार्यकर्यांना मंत्रालयाच्या आवारातच अटक केली आहे.

 

तुर्भेतील पीडब्ल्यूडी कार्यालयात तोडफोड...

सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांमुळे सोमवारी सकाळपासून वाहतूकीची कोंडी झाली आहे. या खड्यांच्या निषेधार्ध मनसेने सोमवारी तुर्भेतील पीडब्ल्यूडी कार्यालयात तोडफोड करून निधेध नोंदवला होता. त्यानंतर रस्त्यांच्या दुर्दशेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी मध्यरात्री मनसेने थेट मंत्रालयाबाहेरील रस्ता फोडला.

 

राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांचे समर्थन...
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्यांनी तुर्भे येथील कार्यालयात केलेल्या तोडफोडीचे समर्थन केले आहे. 'माझ्या सैनिकांनी केलेले आंदोलन योग्य आहे. सरकारला रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नसतील तर, किमान मनसेचे आंदोलन तरी दिसेल' असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या समर्थनामुळे मनसेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...