आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस यांनी वाचली केंद्र सरकारच्या कामांची जंत्री, म्हणाले- मोदी सरकार पारदर्शी व उत्तरदायी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शनिवारीच चार वर्षे पूर्ण केली. गेल्या चार वर्षात केंद्रातील सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला हे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या कामांची जंत्रीच वाचून दाखवली. मोदी सरकार पारदर्शी व उत्तरदायी आहे असे   फडणवीस यांनी सांगितले.  

 

फडणवीस यांनी मोदी सरकारच्या कामांची जंत्री वाचून दाखवताना काय काय म्हणाले....

 

- राज्यात 2 कोटी 18 लाख जनधन खाती सुरू
- 3 कोटी 98 लाख परिवारांना गॅस कनेक्शन
- 15 हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या
- मुंबईतील रेल्वेसाठी 40 हजार कोटी रूपये दिले.
- बीड, जालना जिल्ह्यांनी पीक विमा योजनेचा घेतला सर्वाधिक लाभ
- राज्यात रस्ते निमिर्तीचे काम वेगाने व प्रगतीपतावर
- महाराष्ट्रात आजवरची सर्वाधिक कडधान्य खरेदी
- राज्यातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राकडून 36 हजार कोटी रूपये
- 20 वर्षापासून रखडलेला नवी मुंबई विमानतळ प्रकल्प मार्गी 
- देशातल्या 100 प्रकल्पापैकी 26 प्रकल्प महाराष्ट्रात
- 20 जिल्ह्यात पासपोर्ट केंद्र सुरू केली
- कोल्डस्टोरोज, फुडपार्कसाठी राज्याला सर्वाधिक निधी मिळाला
- शिवस्मारकाच्या कामाला परवानगी, जलसिंचन व जलयुक्त कामामुळे शेतीला प्रोत्साहन, पाऊस कमी पडूनही शेती उत्पादन चांगले
- मोदींनी देशाचा मान जगात वाढवला, त्यामुळे भारताचा दबदबा वाढला.
- मी 80 टक्के विकासावर बोलतो व तर 20 टक्के राजकारणासाठी बोलावे लागते
- राज्यात मागील सात महिन्यात सर्वाधिक रोजगारनिर्मिती महाराष्ट्रात.
- रोजगारनिर्मिती विभाग (EFFO) नुसार मागील सात महिन्यात राज्यात 8 लाखांहून अधिक नोक-या मिळाल्या.

बातम्या आणखी आहेत...