आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अराजकसदृश परिस्थिती निर्माण करून आणीबाणी लादण्याचा मोदींचा डाव- प्रकाश आंबेडकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील राज्याराज्यांमध्ये आरक्षण समर्थक आणि आरक्षणविरोधी असे समाज गट उभे करायचे, त्यातून दंगली घडवायच्या आणि देशात अराजकसदृश परिस्थिती निर्माण करायची. त्यायोगे आणीबाणी लागू करायची, ज्यामुळे निवडणुका पुढे ढकलता येतील, असे षड््यंत्र केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी सरकारने  रचले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते व माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेत केला.  


अॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ‘शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची अटक टाळण्यासाठी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या तपासाची दिशाच बदलली जाते आहे. त्यासाठी ‘एल्गार परिषद’चा माओवाद्यांशी संबंध जोडला असून ही परिषद आयोजित करण्यासाठी ज्या बुद्धिमंतांनी मदत केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  


देशात अराजक माजवण्यासाठी आरक्षण धोरणविरोधी शक्तींना भाजप सरकारे बळ देत आहेत. पोलिसांना वापरून भाजप आपले ईप्सित साध्य करू इच्छित आहे. राज्यात मागच्या वर्षी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चांच्या मागे असाच अराजक निर्माण करण्याचा विचार होता. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला हा प्रवास अंतिमत: देशाला आणीबाणीकडे नेणारा आहे. जर पुण्यातील एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसा पुरवला होता, तर मग ही बाब पुढे आणण्यास पोलिसांना पाच महिने कसे लागले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माओवाद्यांकडून धोका असेल तर त्यांची सुरक्षा आणखी वाढवावी,’ अशी मागणी अॅड. आंबेडकर यांनी केली.   

 

बातम्या आणखी आहेत...