आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS: मान्सून केरळात दाखल- 'स्कायमेट'ची घोषणा, 48 तासांत कोकणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या सामान्य नागरिक व शेतक-यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या केरळात मंगळवारी मान्सूनने आगमन झाल्याचे खासगी हवामान संस्था 'स्कायमेट'ने घोषणा केली. पुढील चार दिवसात हा मान्सून महाराष्ट्रात धडकेल असेही त्यांनी सांगितले. तर पुढील २४ तासात कोकणातील सिंधूदुर्गमध्ये वादळी वारा   व गडगडटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे 'स्कायमेट'ने म्हटले आहे. 

 

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने शहरी भागातील उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनीही दिलासा मिळणार आहे. तर बळीराजाही आपल्या शेतीचे व पीकापाण्याचे नियोजन करू शकणार आहे.

 

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 24 ते 48 तासात दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू किनारपट्टी, मालदीव-लक्षद्वीप बेटे आदी मार्गाने मान्सून पुढे वाटचाल करतो. मुंबईत पुढील आठवड्यात मान्सून दाखल झालेला असेल. तर पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील असे सांगितले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...