आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ठाणे- कल्याणमधील उंबर्डे गावात सहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीची जन्मदात्या आईनेच हत्या केलाचा धक्कादायक प्रकार समेोर आला आहे. पोलिसांनी वैशाली प्रधान या महिलेला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशालीला याआधीच एक मुलगा व एक मुलगी आहे. दोन मुलानंतर नको असलेला गर्भपात करण्यासाठी सासूने पैसे दिले होते पण वैशालीच्या नवऱ्याने ते दारुच्या व्यसनात खर्च केले. त्यामुळे नाईलाजस्तव तिसरं मुल जन्माला घालावे लागले. तिसरे अपत्य पुन्हा एकदा मुलगी झाल्याने तिचे पालनपोषण करायचे कसे या चिंतेत होती. वैशालीने मागचा पुढचा विचार न करता मुलीच्या गळ्यावर नखाने ओरखडले. यात रक्तबंबाळ झालेल्या तान्हुलीला शेजाऱ्यांनी उपचारासाठी डॉक्टराकडे नेले. मात्र, तिचे प्राण वाचवण्यास अपयश आले. ठाणे सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनी या तान्हुलीची गळ्यावर नख मारून हत्या केल्याचा अहवाल देत पोलिसांना पाचारण केले. कल्याण पोलिसांनी याप्रकरणी वैशाली हिला ताब्यात घेतले. अखेर पोलीस चौकशीत तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.