आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध BIKE ट्रेनरची आत्‍महत्‍या; माधुरी, अनुष्का, श्रद्धासह कॅटरिनाला दिली ट्रेनिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कित्‍येक हजार किलोमीटरचा प्रवास चेतनाने रॉयल एनफिल्‍डवर केला आहे. - Divya Marathi
कित्‍येक हजार किलोमीटरचा प्रवास चेतनाने रॉयल एनफिल्‍डवर केला आहे.

मुंबई- प्रसिद्ध महिला दुचाकी प्रशिक्षक चेतना पंडित (२७) यांनी साेमवारी रात्री गाेरेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन अात्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून 'मला महत्त्वाकांक्षा पूर्ण करता न अाल्यामुळे मी अात्महत्या करत आहे', असे म्हटले अाहे. या प्रकरणी दिंडाेशी पाेलिसांनी अपघाती मृत्यूची नाेंद केली अाहे. 


पंडित गाेरेगाव पूर्वमधील पद्मावतीनगरमधील एका फ्लॅटमध्ये तीन मैत्रिणींसह भाड्याने राहत हाेत्या. घरामध्ये काेणी नसल्याचे पाहून त्यांनी साेमवारी रात्री छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन अात्महत्या केली. चेतनाबराेबर राहणारी मैत्रीण घरी परतल्यानंतर तिने दरवाजाची बेल वाजवली. मात्र, अातून काेणताही प्रतिसाद मिळाला नाही.  चेतनाचा फाेनदेखील लागत नव्हता. अखेर या मैत्रिणीने दुसऱ्या किल्लीच्या मदतीने दरवाजा उघडला त्या वेळी चेतनाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत अाढळून अाला. 


मृतदेहाच्या जवळ पाेलिसांना सुसाइड नाेट अाढळून अाली असून माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण न करता अाल्यामुळे मी अात्महत्या करत असल्याचे चेतनाने म्हटले अाहे. चेतनाला एक लहान भाऊ असून या नाेटमध्ये त्यांनी भावाचीही माफी मागितली अाहे. पाेलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नाेंद केली अाहे. मात्र, चेतना यांचे अापल्या प्रियकराबराेबर ब्रेकअप झाले असल्याने त्यातून त्यांनी हे टाेकाचे पाऊल उचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत अाहे.  


माधुरी, अनुष्का, श्रद्धासह कॅटरिनाला प्रशिक्षण
मूळ कर्नाटकमधील शिमाेगा येथे राहणाऱ्या चेतना यांना महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासूनच दुचाकीचे आकर्षण हाेते. त्या एक उत्तम बाइक रेसर हाेत्या. तसेच त्या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या राेड कॅप्टन हाेत्या. मुंबर्इतल्या अनेक महिलांना त्यांनी दुचाकी चालवायला शिकवले. विशेष करून धूम ३ मध्ये कटरिना कैफ तसेच अनुष्का  शर्मा, श्रद्धा कपूर अाणि माधुरी दीक्षित या बाॅलीवूड अभिनेत्रींनी चेतना यांच्याकडून दुचाकी प्रशिक्षणाचे धडे गिरवले हाेते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो.... 

 

बातम्या आणखी आहेत...