आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुप्रिया सुळे होणार आता \'ब्लॉगर’, ब्लॉगच्या माध्यमातून करणार भाष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तम संसदपटू असा नावलौकिक मिळवलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आता लवकरच ब्लॉगरच्या भूमिकेतही दिसणार आहे. राज्यातील किंवा राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि इतर क्षेत्रांतील चालू घडामोडींवर भाष्य करणारा त्यांचा एक ब्लॉग लवकरच सुरू होणार असून त्या माध्यमातून त्या सोशल मीडियात अधिक सक्रिय होणार आहेत. येत्या मकरसंक्रांतीचे औचित्य साधत त्यांचा पहिला ब्लॉग प्रकाशित होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.   


एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी आणि खंबीर राजकीय भूमिका यामुळे खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत चांगल्याच लोकप्रिय आहेत. लोकसभेत निव्वळ हजेरी न लावता सुप्रिया सुळे या प्रत्येक महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होत असतात. युवा खासदारांमध्ये तर त्या लोकप्रिय आहेतच, मात्र राजकीय समीक्षकही त्यांच्या मतांची गंभीरतेने दखल घेत असतात. मात्र, लोकसभेतील चर्चांमध्ये मांडलेली एखादी भूमिका सामान्य जनतेपर्यंत तितक्याच प्रभावीपणे पोहोचत नाही. परिणामी आपली भूमिका प्रभावीपणे आणि थेट लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ब्लॉग लिहिण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे समजते. सध्या त्या फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. आता त्या ब्लॉगद्वारे कशा प्रकारे व्यक्त होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी शरद पवार, सुशील कुमार शिंदे, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे आदी नेत्यांनी वर्तमानपत्रांमधून विपुल लेखन केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर पी. चिदंबरम, उपराष्ट्रपतिपदी निवड होण्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांनीदेखील वर्तमानपत्रांतून विपुल लेखन केले आहे.  


साेशल मीडियावर खूप सक्रिय  
सुप्रिया सुळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.  राज्यातील २२ हजार ७९५ किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. शिवाय, १७ जिल्ह्यांतील रस्ते १०० टक्के खड्डेमुक्त झाल्याचाही त्यांचा दावा होता. 

बातम्या आणखी आहेत...