आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MPSC- विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर, नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात अव्वल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) च्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) मुख्य परीक्षेत नांदेडच्या शिवाजी जाकापुरेने राज्यातून अव्वल क्रमांक मिळवला आहे तर महिला प्रवर्गातून सांगलीची शीतल बंडगर ही पहिली आली आहे. एसटीआयची मुख्य परीक्षा 7 जानेवारीला घेण्यात आली होती.  

 

या परीक्षेत मागासवर्गीय प्रवर्गातून ठाणे जिल्ह्यातील प्रमोद केदार हे पहिला आला आहे. शिवाजी जाकापुरे ला 156, तर प्रमोद केदार याला 148 गुण मिळाले आहेत. तर शीतल बंडगरला 141 गुण मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या मुख्य परीक्षेला 4 हजार 430 विद्यार्थी बसले होते. त्यातून उत्तीर्ण झालेल्या 251 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या निकालातून शिफारशीसाठी निवडण्यात न आलेल्या परीक्षार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांना दहा दिवसात अर्ज करता येईल, असंही आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलेले आहे.

 

गेल्या वर्षी सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीन पदांसाठी संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यातून तीन लाख 30 हजार 909 विद्यार्थी बसले होते. यातून 4 हजार 430 उमेदवारांची  मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यातून 251 उत्तीर्ण उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...