आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे तू अंबानी आहेस की भिखारी!, मुकेश अंबानींच्या मुलांना चिडवायचे वर्गमित्र, वाचा का..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकेश-नीता अंबानी आपल्या तीन मुलांसह... - Divya Marathi
मुकेश-नीता अंबानी आपल्या तीन मुलांसह...

मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश हा श्लोका मेहता या तरुणीशी या वर्षाअखेर विवाहबद्ध होणार असल्याचे समोर येत आहे. तसेच या दोघांचा साखरपुडा पुढील महिन्याभरात होणार असल्याचे कळते. श्लोका ही हिरे व्यापारी रसेल मेहता यांची धाकटी कन्या आहे. अंबानी आणि मेहता कुटुंबियांकडून याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.

 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी नेहमीच आपल्या रॉयल लाईफ आणि बिजनेसमुळे चर्चेत राहतात. नीता अंबानी या सुद्धा आयपीएल आणि विविध सामाजिक कामामुळे चर्चेत असतात. मात्र, आकाशसह ईशा व अनंत ही त्यांची मुले लाईमलाईटपासून दूर असतात. नव्हे ती ठेवली जातात. ते कॅमे-यासमोर फारच कमी वेळा दिसतात. पण काय तुम्हाला माहित आहे का की, मुकेश अंबानींच्या तीन मुलांचा (अनंत, आकाश आणि ईशा) महिन्याचा पॉकेट मनी किती असेल? जेव्हा ते शाळेत जायचे तेव्हा त्यांना किती पॉकेट मनी मिळायचा. याच राज खुद्द नीता अंबानी यांनीच खोलले होते. मुलांना मिळायचे फक्त 5 रूपये....

 

- idiva ला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये नीता अंबानी यांनी मुलांबाबत एक किस्सा सांगितला होता.
- नीता यांनी सांगितले होते की, जेव्हा माझी मुले शाळेत जायची. तेव्हा मी त्यांना दर शुक्रवारी 5 रूपये द्यायची. ज्याद्वारे ते स्कूल कॅंटीनमध्ये स्नॅक खायचे.
- एकदा असे घडले की, माझा लहान मुलगा अनंत माझ्याकडे पळत आला आणि मला म्हणाला की, 10 रूपये दे. 
- मी म्हणाले कशाला तर तो म्हणाला की, स्कूलमध्ये माझे मित्र मला चिडवतात की, तू फक्त 5 रूपये घेऊन येतो. तू अंबानी आहे की भिखारी....
- हे ऐकून मला वाईट वाटले. कारण मुकेश अंबानींनी पैसे बचत करायची कला आपल्या पित्याकडून (धीरूभाई) शिकली आहे.
- ज्यात ते (मुकेश अंबानी) यशस्वी झाले आणि त्यांना वाटते की, माझ्या मुलांनी (अनंत, आकाश आणि ईशा) यांनी हे शिकले पाहिजे.
- नीता अंबानी सांगतात की, मुकेश या विचारामुळे मी मुलांनाही कमीत कमी पैशात सर्व कसे मॅनेज करायचे ते शिकवले.
- कारण मलाही वाटते, माझ्या मुलांनी सामान्य मुलांप्रमाणेच राहावे. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत. त्यामुळे मी त्यांना लहानपणी आपण खूप श्रीमंत आहोत हे कधीही जाणवू दिले नाही.

 

नीता अंबानींचे मुलांवर मध्यमवर्गीय संस्कार-

 

- मुकेश आणि नीता यांनी आकाश, अनंत आणि मुलगी ईशाला स्वत:च्याच मालकीच्या शाळेत शिकवले. 
- पण या तिन्ही मुलांच्या शिक्षण आणि संस्कारावर त्यांनी वैयक्तिक लक्ष ठेवले आहे. शाळेतही त्यांच्यावर लक्ष ठेवले जायचे. पण त्यांना याची माहिती नसायची.
- कारण मुकेश अंबानींच्या मालकीच्या धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये नीता यांची बहिण प्रिन्सीपॉल आहेत. त्या बहिणीच्या मुलांवर नकळत लक्ष ठेवायच्या. 
- त्यांचे इतर मुलांसोबत कसे वागणे आहे, सोबतच त्यांचा वावर कसा आहे यावर वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष ठेवले जायचे. पण तीनही मुलांना याची काहीही कल्पना नसायची.
- भावी आयुष्यात 'चांगला माणुस' म्हणून त्यांची ओळख व्हावी यासाठी दोघेही नेहमी प्रयत्नशील असतात. सर्वसामान्य आईप्रमाणेच नीताही त्यांच्या मुलांचा सांभाळ करतात हे ऐकून अनेका ते खरं वाटत नाही. पण हे सत्य आहे.

 

कारने नव्हे पब्लिक टान्सपोर्टने स्कूलला जायची मुले-

 

- जगातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांची मुले शाळेत महागड्या कारने जात नव्हती तर, घर ते शाळा हा प्रवास ते पब्लिक ट्रान्सपोर्टने करत होते. 
- गर्भश्रीमंतांच्या मुलांचा सांभाळ असाही होऊ शकतो हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
- आपली मुले डाऊन-टू-अर्थ राहिली पाहिजे यासाठी कटाक्षाने त्यांचा प्रयत्न राहिला आणि त्यात त्यांना यशही आल्याचे दिसते.
- कारण आज वयाच्या 25 व्या वर्षीत एवढ्या श्रीमंत व्यक्तीचे ही मुले तुम्हाला कुठेही चमकोगिरी करताना दिसणार नाहीत.
- याचे श्रेय त्यांची आई नीता अंबानी यांनाही जाते. कारण नीता अंबानी यांचे स्वत:चे बालपण व पालन-पोषण मुंबईतील सर्वसामान्य - मध्यमवर्गीय कुटूंबात झाले आहे. 
- याची शिस्त आपोआपच त्यांनी आपल्या मुलांत उतरवली. नीता अत्यंत कडक शिस्तीत वाढल्या आहेत. लग्नाआधी अधिकवेळ घराबाहेर राहाण्याची परवानगी नीतांची आई देत नसायची. 
- नीता अंबानी सुद्धा त्यांच्या शाळा-कॉलेज जीवनात मुंबईतील बेस्ट बसमधून जात असत.

 

चर्चेत राहतो अनंत अंबानी-

 

एक वेळ अशी होती की, अनंत खूपच जाड होता. मात्र, त्याने मेहनत घेतली आणि आपले वजन कमी केले. यानंतर तो खूपच चर्चेत आला.
- आता तो आयपीएलच्या सामन्यात आपली टीम मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतो. मागील काही काळापासून तो आता बॉलिवूडच्या सेलेब्ससह पार्टी करताना दिसतो.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुकेश-नीता अंबानी यांच्या सुंदर कुटुंबियाबाबत....

बातम्या आणखी आहेत...