आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai plane carsh : पॉली-ट्रॉमा आणि बर्न्समुळे त्या 5 जणांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 28 जून रोजी मुंबईच्या घाटकोपर येथील विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे कारण आता समोर आले आहे. जळाल्याने आणि पॉली-ट्रॉमामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. मृतांमध्ये महिला वैमानिकासह तीन तंत्रज्ञ व एका पादचारी व्यक्तीचा समावेश आहे.

 

फोरेंसिक सर्जन डॉ शिवाजी पाटील, डॉ. राहुल जाधव, डॉ अमित चौहान आणि डॉ. प्रकाश हिंगे यांच्या पथकाने ही शवविच्छेदन प्रक्रिया केली. संपूर्ण प्रक्रिया की इन कॅमेरा करण्यात आली. के.एम.च्या फॉरेन्सिक विभागातील ऑडिंटोलॉजिस्ट डॉ. हेमलता पांडे या देखील मृतदेहाची ओळख पटवी म्हणून शरितून दात काढण्यासाठी टीममध्ये सामील झाल्या होत्या.


मुंबईतील घाटकोपरमध्ये अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीत गुरुवारी दुपारी १२ सीटर चार्टर्ड विमान कोसळले यात विमानातील २ पायलट, २ तंत्रज्ञ व एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर हे विमान काेसळले. तिथे काेणीही राहत नसल्याने माेठी प्राणहानी टळली. जुहू विमानतळावरून युवाय एव्हिएशन प्रा. लि.कंपनीच्या किंग एअर-९० विमानाने चाचणी उड्डाण केले. ते येथेच परतणार होते. मात्र, १.१० वाजता ते घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरातील झाडाला धडकले. नंतर पेट घेऊन विमान निर्माणाधीन इमारतीवर कोसळले. स्फोट होऊन त्याचे तुकडे झाले. विमानातील कॅ. प्रदीप राजपूत (४०), सहवैमानिक मारिया झुबेरी (४०), सुरभी (३५, तंत्रज्ञ) व मनीष मांडे (३५, तंत्रज्ञ) यांचा मृत्यू झाला. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात अाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...