आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मुंबई: बदलापुरच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर Mumbai Badlapur Trekker Dies In Uttarakhand From Cold

मुंबई: बदलापुरच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तराखंडमध्ये ट्रेकींगसाठी गेलेल्या बदलापूरच्या एका ट्रेकरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षद आपटे (वय- 33) या ट्रेकरचे नाव असून बदलापूरच्या पूर्व भागातील गांधी चौकात त्याचे घर आहे. उत्तराखंडच्या बारा सुपा भागात त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. हर्षल पहिल्यांदाच उत्तराखंडमध्ये ट्रेकींगसाठी गेला होता.

 

या घटनेची माहिती मिळताच हर्षदचे कुटुंबीय शुक्रवारी बदलापूरहून उत्तराखंडसाठी रवाना झाले आहेत.

 

हर्षद हा 11 जणांच्या टीमसोबत 7 जूनला उत्तराखंडला ट्रेकिंगसाठी गेला होता. 9 तारखेला या सगळ्यांनी ट्रेकिंगची सुरुवात केली. 15 जून रोजी ते ट्रेक संपवून बेस कॅम्पकडे परतत होते. मात्र वाटेतला शेवटचा टप्पा असलेल्या बारा सुपा भागात आल्यावर अचानक हर्षदला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास यामुळे अत्यवस्थ झालेल्या हर्षदला तातडीने खाली आणण्यात आले, मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

 

कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर...

हर्षद विवाहित असून त्याला 5 वर्षांची मुलगीही आहे. त्याच्या अकस्मात जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हर्षदला ट्रेकिंगचा प्रचंड छंद  होता. त्याने महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले यापूर्वी सर केले होते.

 

12 ट्रेकर्सची सुटका..

हिमाचल प्रदेशात गेलेल्या महाराष्‍ट्रातील 12 ट्रेकर्सची सुटका करण्‍यात आली आहे. मागील काही दिवसांपासून हे ट्रेकर्स हिमाचल प्रदेशातील किन्नूर येथे अडकले होते. इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांनी ट्रेकर्सची सुटका केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...