आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MUMBAI सेंट्रल रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर यंत्रणांकडून तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्यासंबंधी नियंत्रण कक्षाला एक निनावी बुधवारी दुपारी कॉल आला. या कॉलमुळे एकच खळबळ उडाली असून सुरक्षेसंबंधी अलर्ट जारी करण्यात आला. शिवाय मुंबईतील महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपासणी करण्यात आली. 

 

बुधवारी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला एका निनावी फोन कॉल आला. फोनवर गजबजलेले मुंबई सेंट्रल स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. परिणामी आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी यानुसार पावले उचलत तपास केला. तपासात अफवा पसरविण्यासाठी हा बनावट कॉल असल्याचे उघड झाले. तरी या संदर्भात योग्य आणि आवश्यक ठिकाणी सुरक्षा तपासणी करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...