आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन खचली, कारचालकाचा जीव गेला.. तुम्‍ही कधी जागे होणार; मुंबई काँग्रेसचे BMC विरोधात निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वडाळ्यातील लॉइड्स इस्‍टेट सोसायटीच्‍या बाजूची जमीन खचून झालेल्‍या दुर्घटनेबद्दल महापालिका अधिका-यांना जाब विचारण्‍यासाठी व त्‍यांचा निषेध करण्‍यासाठी सोसायटीच्‍या सभासदांसह मुंबई काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्‍यात आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्‍यक्ष संजय निरूपम या मोर्चाचे नेतृत्‍त्व केले.

 

रविवारी रात्री झालेल्‍या मुसळधार पावसामुळे 'लाॅइड इस्टेट' या 32 मजली इमारतीच्या पार्किंगची संरक्षक भिंत खचून 15 वाहनांचा चुराडा झाला होता. यामुळे इमारतीला तडे गेल्‍याने 240 कुटुंबांना घरे रिकामी करण्‍याच्‍या सुचना महापालिकेने दिल्‍या आहेत. महापालिकेचे अधिकारी व बिल्‍डर यांच्‍या भ्रष्‍ट युतीमुळे ही दुर्घटना झाल्‍याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. महापालिकेचा हलगर्जीपणा व भ्रष्‍ट कारभारामुळे आज वडाळ्यातील जमिन खचली उद्या तुमच्‍या पायाखालची जमिनही खचू शकते, अशी टीका त्‍यांनी महापालिका सत्‍ताधा-यांवर केली होती.

 

...तर प्रकाश पाटील यांचा जीव वाचला असता
मंगळवारी 3 शालेय मुलांना वाचवताना कारचालक प्रकाश पाटील (40) यांचा नाल्‍यात बुडून मृत्‍यू झाला होता. हे नाले वेळीच बुजवले असते, तर प्रकाश पाटील यांना जीव गमवावा लागला नसता. सरकार कधी जागे होणार, असा सवाल या दुर्घटनेनंतर संजय निरूपम यांनी विचारला होता.


दरम्‍यान वडाळ्यातील दुर्घटनेनंतर दोस्‍ती बिल्‍डर्सवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. दीपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा अशी बिल्डर्सची नावे आहेत. तसेच संबंधित महापालिका अधिका-यांवरही गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत. महापालिकेच्‍या निष्‍काळजीपणाबद्दल आयुक्‍त व अधिका-यांना जाब विचारण्‍यासाठी महापालिकेसमोर निदर्शने करण्‍यात येत आहे, असे संजय निरूपम यांनी म्‍हटले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आंदोलनाचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...