आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: उबर कॅबमध्‍ये महिला पत्रकाराला सहप्रवाशाने केली मारहाण, गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उबर कॅब शेअर करून प्रवास करणा-या महिला पत्रकाराने आपल्‍याला कॅबमध्‍ये सहप्रवाशी महिलेने जबर मारहाण केल्‍याचा आरोप केला आहे. महिलेच्‍या तक्रारीनंतर एनएम जोशी मार्ग पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महिला पत्रकाराने या सर्व घटनेची माहिती आपल्‍या फेसबुक पेजवर दिली आहे.

 

पोलिस करत ओहत तपास
याप्रकरणी डीसीपी विरेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, महिला पत्रकार उश्‍नोता पॉल या सोमवारी उबेर कॅबने कमला मिल येथील आपल्‍या ऑफीसमध्‍ये जात होत्‍या. त्‍यांनी आरोप केला आहे की, यादरम्‍यान त्‍यांच्‍यासोबत प्रवास करणा-या महिलेने त्‍यांना केवळ अपशब्‍दच म्‍हटले नाही तर त्‍यांना जबर मारहाण करत त्‍यांचे केसही उपटले.' सध्‍या या प्रकरणी एनसी दाखल करण्‍यात आली असून आम्‍ही पुढील तपास करत आहोत.'


सोशल मिडियावर पोस्‍ट केली घटनेची सर्व माहिती
पिडित पत्रकार महिलेने या सर्व घटनेची माहिती आपल्‍या फेसबुक पेजवर पोस्‍ट केली आहे. यामध्‍ये तिने म्‍हटले आहे की, 'सोमवारी सकाळी मी एका महिलेसह उबेरमध्‍ये प्रवास करत होते. मध्‍येच अचानक त्‍या महिलेने आपल्‍याला अगोदर सोडण्‍यात यावे कारण आपण अधिक पैसे दिले आहे, असे चालकाला सांगितले. चालक काही बोलण्‍याचा प्रयत्‍न करताच ती त्‍याच्‍यावर भडकू लागली. यादरम्‍यान मी शांतपणे बसले होते. ती महिला नंतर माझ्या वस्‍तूंना 'डट्री थिंग्‍स' म्‍हणाली तरीही मी शांत राहिले. यानंतर तिने मला 'चंकी' म्‍हणण्‍यास सुरूवात केली. मी तिचा फोटो काढण्‍याचा प्रयत्‍न करताच तीने माझा मोबाईल हिसकावून घेतला व मोबाईल तोडण्‍याची धमकी दिली. मी तिच्‍या 'चिंकी' म्‍हणण्‍यावर आक्षेप घेतला असता, 'तु काय करशील', असे ती म्‍हणाली. याच वेळी तिचा ड्रॉप पॉईंट आला. मात्र उतरण्‍यापुर्वी तिने माझ्यावर जोरदार हल्‍ला केला. ती माझ्या केसांना ओढू लागली. यावेळी चालक व स्‍थानिक नागरिकांनी मला तिच्‍या तावडीतून सोडवले.'


उबेरने केली नाही मदत
महिला पत्रकाराने उबेरवर आरोप केला आहे की, 'या घटनेनंतर मी मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्‍यासाठी गेले होते. मुंबई पोलिसांनीही उबेरला कॉल करून महिलेची माहिती देण्‍याची विनंती केली. मात्र ग्राहकांच्‍या सुरक्षेचा हवाला देत उबेरने माहिती देण्‍यास नकार दिला.'  पॉलने पुढे सांगितले की, 'याप्रकरणी मला उबेरकडून मदतीची अपेक्षा होती. हल्‍लेखोर महिला त्‍यांची ग्राहक होती तर मी कोण होते?'

 

चालकाचा जबाब महत्‍त्‍वाचा
याप्रकरणी उबर चालक मिनहाज शेख यांनी सांगितले की, 'मला उबर कंपनीकडून कॉल होता. या सर्व घटनेची माहिती त्‍यांनी माझ्याकडून जाणून घेतली. मी मुंबई पोलिसांनाही पुर्ण माहिती दिली आहे.'  पोलिसांनूसार, याप्रकरणी चालकाचा जबाब अतिशय महत्‍त्‍वपूर्ण ठरणार आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...