आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत लष्कराने 117 दिवसात बांधले 3 फूट ब्रिज, डब्बेवाल्यांनी केले लोकार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय लष्कराने उभारलेल्या परळ-एल्फिन्स्टन पूल, करीरोड आणि आंबिवली या रेल्वे स्थानकातील पूलांचे आज लोकार्पण केले.  मुंबईतील पाच डब्बेवाल्यांची हस्ते या तीनही फुटओवर ब्रीजचे लोकार्पण केले. बबन वाळूंज, सोपान मोरे, सुभाष तळेकर, यमुनाजी घुले आणि उल्हास मुखे अशी त्यांची नावे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सहा महिन्यानंतर हे तीन पादचारी पुल मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले. लष्कराने हे ब्रीज 117 दिवसात बांधून मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिले.

 

सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिन्स्टन रोड स्टेनशनवरील पूलावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर या पादचारी पुलाचे काम वेगाने व्हावे यासाठी याचे काम लष्कराकडे देण्यात आले होते. यावरून टीकाही झाली होती. अखेर आज या पुलांचे लोकार्पण करण्यात आले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....

बातम्या आणखी आहेत...