आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हायकोर्टात 'जाॅली एलएलबी'प्रमाणे कामकाज, पहाटेपर्यंत सुरू होती सुनावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतातील कोर्टात बऱ्याच कालावधीसाठी खटल्यांच्या सुनावण्या प्रलंबित राहतात. त्यामुळे कोर्ट प्रक्रिया म्हणजे 'तारीख पे तारीख' हे जणू समिकरण बनले आहे. मात्र, मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती शाहरुख कथावाला हे त्याला अपवाद ठरले. शाहरुख कथावाला यांनी खटले त्वरीत निकाली निघावेत यासाठी वेळेची कुठलीही तमा न बाळगता पहाटे साडे तीन वाजेपर्यंत सुनावणीचे कामकाज सुरुच ठेवले. त्यांच्या या कामगिरीने विक्रम प्रस्थापित केला आहे.   

 

काही दिवसांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या 'जाॅली एलएलबी' चित्रपटात पहाटेपर्यंत कोर्टाचे कामकाज सुरू असल्याचे दाखवण्यात आले होते. याच पद्धतीने मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती शाहरुख कथावाला यांनी पाहाटेपर्यंत कोर्टाचे काम सुरू ठेवले. त्यांच्या या कामावर सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होतोय. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होण्यापुर्वीचा मुंबई हायकोर्टाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. अशा वेळी न्यायामूर्ती शाहरुख कथावाला यांनी खचाखच भरलेल्या न्यायालयात पहाटे साडे तीन वाजेपर्यंत विविध खटल्यांवर सुनावणी घेतली. तर, अनेक खटल्यांवर त्यांनी आदेशही दिले.

बातम्या आणखी आहेत...