आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maratha Reservation: शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करा, हायकोर्टाचे राज्‍य सरकारला निर्देश, Mumbai Highcourt Asks State Government About Maratha Reservation

Maratha Reservation: शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करा, हायकोर्टाचे राज्‍य सरकारला निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील एक वर्षापासून प्रलंबित असलेल्‍या मराठा आरक्षणावरून मुंबई हायकोर्टाने राज्‍य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मराठा आरक्षणाच काय झाल? असा थेट सवाल करत येत्‍या शुक्रवारपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्‍याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहे.


मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्‍याच्‍या आत घेण्‍यात यावा. जेणेकरुन लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात डिसेंबर 2017 मध्ये दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी करताना न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने राज्‍य सरकारला हे निर्देश दिले.

 

मराठा आरक्षणासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या आयोगाच काम कस सुरू आहे, याबाबत शुक्रवारी सरकारने स्‍पष्‍टीकरण द्यावे, असेही हायकोर्टाने सांगितले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे अनेक महिन्‍यांपासून प्रलंबित आहे. अजूनही मराठा आरक्षणासंदर्भात काम दिसत नसल्याने आयोगाने आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे, असे मत न्यायालयानं मांडलं आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...