आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: अमेरिकन बॉयफ्रेंडला हॉटेलात घेऊन गेली दिल्लीतील तरूणी, मग घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील एका बड्या हॉटेलात केवळ अविवाहित असल्याने एका जोडप्याला रूम देण्यास नकार दिला आहे. एक महिन्यापूर्वीच ऑनलाईन बुकिंगद्वारे हॉटेलमधील रूम बुक करूनही ती देण्यास नकार दिल्याने संबंधित तरूणीने हॉटेलविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

याबाबतची माहिती अशी की, दिल्लीतील 23 वर्षीय एका तरूणीने         एक महिन्यापूर्वी संबंधित हॉटेलची रूम ऑनलाईन बुक केली होती. या तरूणीचा 30 वर्षीय बॉयफ्रेंड अमेरिकचा आहे. तो भारतात हॉलिडेसाठी येणार असल्याने तरूणीने मुंबईतील हॉटेलात बुकिंग केले होते.

 

बुकिंग केल्यानुसार, संबंधित तरूणी आपल्या बॉयफ्रेंडसह हॉटेलात गेली असता त्यांच्याकडे ओळखपत्र मागण्यात आले. जेव्हा आमची ओळखपत्रे त्यांच्याकडे दिली असता तुम्ही अविवाहित असल्याने रूम देता येणार नाही असे हॉटेल कर्मचा-याने सांगितले.

 

हॉटेल कर्मचा-याने आम्हाला तेथे एक बोर्ड लावलेला दाखवला. त्यात या बोर्डवर कपल्सला एंट्री दिली जाणार नाही असे लिहले होते. यानंतर संबंधित तरूणीने बुकिंग रद्द करून पैसे परत मागितले असता ते देण्यासही नकार दिला. तुम्ही एकटे राहू शकता, बुकिंग रद्द करता येणार नाही तसेच पैसेही परत मिळणार नाहीत असे हॉटेल व्यवस्थापनाने या जोडप्याला सांगितले.

 

यानंतर या तरूणीने तक्रार दाखल केली. अविवाहित जोडप्यांना हॉटेल्समध्ये रूम देऊ नये असा कोणताही कायदा नसताना अशी अडवणूक का केली जाते. नो- कपल पॉलिसी हा काय प्रकार आहे. मुंबईत येण्याआधी आम्ही दिल्ली, जयपूर, उदयपूर आदी शहरांत फिरून आलो पण तेथील हॉटेलात अशा अडचणींना सामोरे जावे लागले नसल्याचे तरूणीने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...