आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विनी बिद्रे खून प्रकरण; मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अश्विनी बिद्रे खून प्रकरणी आता अश्विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. मीरा - भाईंदरच्या खाडीत अश्विनीचा मृतदेह टाकण्यात आला होता.  यामुळे मृतदेहाचा अवशेषांचा शोध घेण्यात येणार आहे. सोमवारी ही शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. 

 

 

न्यायालयात गुरुवारी अश्विनी बिद्रेचा खून झाला असल्याचा खुलासा करण्यात आला होता. तशी कबुली अभय कुरुंदकर याचा अटकेत असलेला चालक कुंदन भांडारी आणि मित्र महेश फणीकर यांनी दिली. अश्विनीचा खून करून तिचा मृतदेहाचे तुकडे करून ते दुसऱ्या दिवशी मीरा भाईंदरच्या खाडीत टाकण्यात आले होते.

 


यासाठी अभय कुरुंदकर याला राजू पाटील, कुंदन भांडारी आणि महेश याने वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. हा तपास संगीत अल्फान्सो यांनी गतवर्षी केला होता पण तपास पूर्ण होता होता त्यांची बदली झाली होती. परंतु पुन्हा त्यांना घेतल्यानंतर या तपासाला वेग आला आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. परंतु या तपासाला उशीर झाल्याने तपासातील पुरावे नष्ट होण्याची भीती अश्विनीचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...