आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या मुलाचा नाहक बळी, सरकारने मदत द्यावी; विमान अपघातात मृत युवकाच्या कुटुंबीयांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरकार, विमान कंपनीने अाम्हाला मदत करावी. आमदार, खासदार व अधिकारी भेटत नाहीत तोपर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही, असा इशारा देत विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला पादचारी गोविंद दुबेच्या नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फोनवरून आश्वासन दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली. दरम्यान, अन्य मृतदेह डीएनए चाचणीनंतर रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांच्या ताब्यात दिले. 


गोविंद मूळचा उत्तर प्रदेेशातील होता. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले. तोच कमावता असल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्याचे आईवडील, पत्नी व तीन भाऊ असा परिवार आहे. घर चालवण्यासाठी तो अहोरात्र मेहनत घेत होता, असे त्याचे मामा प्रमोद पांडे म्हणाले. गोविंदचा नाहक बळी गेला. पण सरकार व विमान कंपनीनेही दखल घेतली नाही. जोपर्यंत याची दखल घेतली जात नाही किंवा गोविंदच्या पत्नीला पुढील आयुष्य जगण्यासाठी आर्थिक मदत केली जात नाही. तोपर्यंत गोविंदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत त्याच्या कुटुंबीयाने रुग्णालयातच आंदोलन सुरू केले. पण, ठाण्यातील काही नगरसेवक व आव्हाडांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. 
 

मारिया देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक 
मारिया या देशातील पहिल्या मुस्लिम वैमानिक असून त्यांच्या निधनाने देशाचे व मुस्लिम समाजाचे मोठे नुकसान झाले अाहे. विमान उडवण्यास हिरवा कंदील मिळालेला नाही, वातावरणही पोषक नसल्याचेे मारियाने सांगितले होते. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मारियाचे पती प्रभात यांनी केली. 


दुर्घटनेसाठी काेणाला दाेष नाही : वैमानिक पुत्र 
अपघातात मृत मुख्य वैमानिक प्रदीप यांच्या पत्नीने हातातील कडे, चेन व तुटलेल्या दातावरून त्यांना ओळखले. डीएनए चाचणीची गरज वाटत नसल्याचे सांगत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या दुर्घटनेसाठी अापण काेणालाही दाेष देणार नाही. पण, चौकशी करावी, असे प्रदीप यांचे बंधू या वेळी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...