आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- पुणे हायपरलूपसाठी 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक, कंपनीच्या अभियंत्यांचे पथक लवकरच पुण्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आणणाऱ्या हायपरलूप तंत्रज्ञानाची लवकरच पुण्यात चाचणी होणार असून त्यासाठी यासंबंधीत कंपनीच्या अभियंत्यांचे लवकरच. पथक पुण्यात दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील हायपरलूप चाचणी केंद्राला केली आहे. पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक निश्‍चित केला आहे. या तंत्रज्ञानासाठीची 70 टक्के सामग्री आणि उपकरण राज्यातच उपलब्ध होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्टिट करुन दिली आहे. 

 

अमेरिकेतील नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाची चाचणी सुरू असलेल्या ठिकाणाला फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. त्यांनी हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉइड यांच्याशी चर्चा केली. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्क्‍लेव्हदरम्यान कराराची घोषणा केली होती. 

बातम्या आणखी आहेत...