आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग..जनजीवन विस्कळीत; शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-मुंबईसह ठाण्यात 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यात वेग-वेगळ्या घटनांत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा, वसई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या अनेक भागात पाणी साचले आहे. नालासोपारामध्ये रल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. तिन्ही रेल्वे मार्गावर 15 ते 20 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या 24 तासात मुंबईत मुसळधार पावासाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.  

 

मुसळधार पावसाची पहाटेपासूनच जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली आहे.

 

मुंबईच्या अनेक भागात पाणि साचल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतून पुर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक भागातील सेव देखील बंद करण्यात आल्या आहेत. घाटकोपर येतली स्थानकातील एका पुलाला तडे गेले आहेत, त्यामुळे हा पुल बंद करण्यात आला आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. 

 

संबंधीत... संततधारेने मुंबईला सलग दुसऱ्या दिवशीही झाेडपले; येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा


MUMBAI RAIN UPDATE:
> वसई-विरार परिसरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे.

> वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये मुसळधार सरी बरसत आहेत.

> मुलुंड, घाटकोपरमध्येही रिमझिम पाऊस सुरू आहेत. 

> नालासोपारा परिसर पाण्याखाली गेला असून सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. 
> माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची रिमझिम पाऊस सुरू. 

> तिन्ही रेल्वे मार्गावर 15 ते 20 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत.

> येत्या 24 तासांमध्ये मुंबईसह, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता 

 

15 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज....
महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह छत्तीसगढ़, गुजरात, तेलंगाना, दक्षिण कर्नाटक, केरळ, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बंगाल, सिक्किम, असाम, मेघालय आणि ओडिशा या राज्यांत हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा मुंबईतील पावसाचे फोटो....

बातम्या आणखी आहेत...